राशिन मधील आंबेडकर नगर व अण्णाभाऊ साठे नगर मधील मंजूर असलेले सुलभ शौचालय बांधणे बाबत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा निवेदन द्वारे ग्रामपंचायतीला इशारा.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथील आंबेडकर नगर व लहू नगर सुलभ शौचालय मंजूर असून निधी उपलब्ध असून देखील ग्रामपंचायत कडून कोणत्याही प्रकारची दखल अद्याप याबाबत घेतली गेलेले नाही. दोन्ही ठिकाणी महिलांची शौचालयाची होणारी गैरसोय थांबवावी, त्याचबरोबर राशीन हे बाजारपेठेचे मोठे गाव असल्यामुळे तसेच जगदंबा देवीचे मोठे तीर्थक्षेत्र असल्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांची वर्दळ पहावयास मिळते मंदिर परिसरातील स्वच्छतागृह सोडता राशीन मध्ये महिलांसाठी स्वच्छता ग्रहे नाहीत. या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर आंबेडकर नगर व लहू नगर येथील महिलांची स्वच्छता गहृ विना होणारी गैरसोयी पाहता लवकरात लवकर स्वच्छता ग्रहाचे काम पूर्ण करावे अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी तालुका अध्यक्ष कमलेश साळवे यांनी निवेदनाद्वारे राशिन ग्रामपंचायतला दिला आहे.