ब्रेकिंग
छत्रपती संभाजी महाराज जयंती राशीन मध्ये मोठ्या उत्साहात साजरी.

Samrudhakarjat
4
0
1
9
4
7
राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी. :- शंभुराजे ग्रुप च्या वतीने राशिन मध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी दहाच्या सुमारास संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी सभापती पै. श्याम कानगुडे, परीट वाडीचे सरपंच विलास काळे, यशवंत देशमुख, गणेश कदम, संतोष काशीद, शहाजीराजे, बंडूशेठ टाक, पत्रकार दत्ता उकिरडे,
पत्रकार जावेद काझी, युवक नेतृत्व ओम काशीद, व इतर युवक वर्ग ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सायंकाळी ६ ते १० वाजता छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त खास आकर्षक महालक्ष्मी डीजे च्या तालावर अनेक संभाजी महाराज प्रेमींनी डीजेच्या तालावर ठेकाधारीत फटाकड्याची आतषबाजी करीत छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.