मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण उपोषणार्थ सकल मराठा समाजाकडून उद्या राशीन बंदची हाक.

राशीन प्रतिनिधी जावेद काझी. :- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा दर्शनासाठी राशीन परिसरातील सकल मराठा समाज व ग्रामस्थांच्या वतीने आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्या बुधवार दिनांक.1.11.2023. रोजी राशीन शहर दिवसभर कडकडीत बंद राहणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक राशीन येथे साखळी उपोषण चालू राहणार आहे. तसेच सर्वपक्षीय नेत्यांना गाव बंदी राहणार आहे. तसेच उद्याच्या दिवसांमध्ये राशिन शहरात जेवढे राजकीय पक्षाचे होल्डिंग असतील ते ग्रामपंचायत स्तरावर संबंधित कार्यकर्त्यांनी काढून टाकावेत अन्यथा सर्व बॅनर वर काळे फासले जाईल. जोपर्यंत मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत राजकीय पक्षाचे होर्डिंग लावून येत असा इशारा सकल मराठा समाज व इतर ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच मराठा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राशीन ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे, युवराज सिंह राजेभोसले,सौ. हर्षदा अशोक जंजिरे, सौ.कल्याणी मैड . यांनी राशिन ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा सौ.नीलम भीमराव साळवे.
यांच्याकडे लेखी स्वरुपात दिला आहे. तसेच कानगुडवाडी ग्रामपंचायतचे सरपंच शाम कानगुडे, उपसरपंच उद्धव कानगुडे, व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आपला राजीनामा पत्र गटविकास अधिकारी कर्जत यांच्याकडे दिला आहे.