अपघात की घातपात? परळीत सरपंचाला टिप्परने उडवलं!

परळी, बीड: परळी तालुक्यातील एका धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडवली आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने एका सरपंचाला धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेवरून अपघात की घातपात असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बीजेपी नेते संदीप क्षीरसागर यांनी या घटनेवर X (ट्विटर) वर प्रतिक्रिया देत प्रशासनावर व राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “बीडमध्ये सरपंचांना जगायचं असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि परळीच्या मुख्यमंत्रीपदी वाल्मीक कराड यांची नेमणूक करावी. त्याचबरोबर धनंजय मुंडेंना बीडचे पंतप्रधान म्हणून घोषित करावे.”
या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून, बीड जिल्ह्यात शोकाकुल आणि संतप्त वातावरण आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, हा अपघात होता की घातपात, यावर अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
दरम्यान, पीडित सरपंचाच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी गावकऱ्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.