राशीन मध्ये अधिकारी व ठेकेदार यांच्या हलगर्जीपणामुळे लहान निष्पाप बालक ड्रेनेज मध्ये पडून गंभीर जखमी.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी.राशीन मुख्य बाजारपेठेत दौंड धाराशिव रस्त्याचे काम चालू असल्यामुळे संबंधित अधिकारी व ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनचे खड्डे उघडे असल्यामुळे रविवार दिनांक १२ रोजी रात्री ८ वा. च्या सुमारास मोहम्मद अलीम शेख वय वर्ष 10 राशिन येथील लहान बालक शालेय वस्तू खरेदीसाठी आला असता रात्रीच्या अंधारात ड्रेनेज लाईन वरून चालत असताना अचानक आलेला ड्रेनेचा खोल खड्डा न दिसल्यामुळे मोहम्मद अलीम शेख हा लहान मुलगा अचानक खड्ड्यात पडला असता त्याची उंची लहान असल्यामुळे रस्त्यावरील लोकांना आरडाओरडा करून तो मदत मागत होता परंतु त्याची हाक रस्त्यावरील लोकांपर्यंत पोहोचत नसल्यामुळे मोहम्मद शेख जोर जोरात रडू लागला रडण्याचा आवाज रस्त्यावरून चालणाऱ्या किशोर साळवे तसेच राशीन येथील जनसेवा मेडिकलचे मालक अफरोज तांबोळी या दोघांची नजर या रडणाऱ्या बालकाकडे गेली त्यांनी विलंबना लावता त्या लहान चिमुकल्याला लोखंडी सळीईच्या विळख्यात सापडलेल्या लहान मुलास खड्ड्यातून बाहेर काढले. बाहेर काढण्यात आल्यावर तो भयभीत झाला असल्यामुळे रडत होता त्याच्या पोटाला व ओठाला जखम झाल्यामुळे दहा मिनिटे बोलू शकला नाही परंतु नंतर या दोघांनी त्याचे वडिल अलीम शेख यांना ताबडतोब फोन करून बोलावून घेतले.
मोहम्मद याला त्यांच्या स्वाधीन केले. पुढील उपचारासाठी त्याला दवाखान्यात घेऊन गेले आहे. असे अनेक खोल खड्डे रस्त्याच्या दोन्ही ड्रेनेज लाईन मध्ये मागील सहा महिन्यापासून दिसत आहेत परंतु ठेकेदार व अधिकारी यांच्या चाललेल्या निष्काळजीपणामुळे व दांडशाहीमुळे या रस्त्यावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाहीतर मोहम्मद अलीम शेख यासारखे अनेक बालके या दुर्दैवी घटनेचे बळी पडू शकतात हे संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी हे विसरता कामा नये.