आरोग्य व शिक्षणब्रेकिंग
कर्जतमध्ये भीषण अपघात; वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Samrudhakarjat
4
0
1
3
2
4
कर्जत तालुक्यातील रूईगवन फाट्याजवळ श्रीगोंदा-जामखेड रस्त्यावर गुरुवारी रात्री एक भीषण अपघात झाला. पिकअप ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या जोरदार टक्करमध्ये मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. मृत व्यक्ती हा दौंड तालुक्यातील असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते.
अपघाताची माहिती मिळताच मिराजगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत मिराजगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे.
दरम्यान, मिराजगाव पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला असून, पिकअप ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रस्त्यावरील अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाहनचालकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.