किसान मोर्चा आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी दत्तात्रय नलवडे यांची निवड

कर्जत : – कर्जत तालुक्यासह अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात भाजपा किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सुनील काका यादव यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविला असून सर्वसामान्य जनतेच्या प्रत्येक कामात थेट संपर्क ठेवत मदत करण्याचा आगळावेगळा पॅटर्न उभा केला असल्याने किसान मोर्चा कडे सर्वांचेच विशेष लक्ष लागले आहे या अनुषंगाने भाजपा किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडेही सर्वांचे लक्ष असून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी कुंभेफळ येथील दत्तात्रय महादेव नलवडे यांची निवड जिल्हाध्यक्ष सुनील काका यादव यांनी केली आहे. आ. प्रा. राम शिंदे माजी खा. डॉ. सुजय विखे व भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या आदेशाने करण्यात आलेल्या या निवडीबद्दल नलवडे यांचे अनेकांनी अभिनंदन केले असून पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी विशेष परिश्रम करण्याची अपेक्षा यावेळी देण्यात आलेल्या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी दत्तात्रय नलवडे यांची निवड जिल्हाध्यक्ष सुनील यादव यांनी केली आहे.
गेली पंचवीस वर्षापासून राजकारणात सक्रिय असलेले नलवडे यांनी पंधरा वर्ष काँग्रेस मध्ये असताना प्रवीण घुलेचे कट्टर समर्थक म्हणून काम केले पण दहा वर्षांपूर्वी त्यांनी आ. प्रा. राम शिंदे यांचे नेतृत्व मान्य करत भाजपात प्रवेश केला असून सोशल मीडियावर भाजपचा किल्ला लढवणारे समर्थक म्हणून त्यांची ओळख निर्माण आली होती त्यांच्या निष्ठेने केलेल्या कामाचे फळ म्हणूनच त्यांना हे पद देण्यात आले असून या निवडी बद्दल अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.