
कर्जत (प्रतिनिधी) :- संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्षाची निवड आज करण्यात आली. अध्यक्षपदाची माळ पक्षाची मुलुख मैदानी तोफ शेखर खरमरे यांच्या गळ्यात टाकण्यात आली.
किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सुनिल यादव यांच्याकडे सोपविण्यात आली. तालुकाध्यक्ष पदासाठी मोठी चुरस तालुक्यातून पाहायला मिळाली होती. या पदासाठी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष डॉ सुनील गायकवाड, संपत बावडकर, अनिल गदादे,
पप्पूशेठ दोधाड, गणेश पालवे आदींनी मुलाखती दिल्या होत्या. मागील काही दिवसांपासून शेखर खरमरे यांनी पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडली होती. त्याचीच परिणीती म्हणून पक्षा देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला असल्याचे बोलले जात आहे.
सुनिल यादव यांनी देखील शेतकरी हितासाठी केलेल्या कामाचे फळ म्हणून त्यांच्याकडे देखील जिल्हा पातळीवरील जबाबदारी देण्यात आली आहे.