Advertisement
ब्रेकिंग

घुमरी येथील नवीन ३३/११ (5-MVA) वीज उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा आ. रोहित पवार यांच्या हस्ते संपन्न; परिसरातील शेतकऱ्यांची विजेची मोठी अडचण दूर.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील विजेचा लपंडाव थांबवण्यासाठी आ. रोहित पवार यांचे प्रयत्न यशस्वी.

Samrudhakarjat
4 0 1 9 4 9

कर्जत (प्रतिनिधी)  :- कर्जत-जामखेड मतदारसंघातील सामान्य नागरिकांना आणि विशेषतः शेतकऱ्यांना भेडसावत असलेली विजेची अडचण सोडवण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार असताना वेळोवेळी प्रयत्न करून नवीन वीज उपकेंद्र तसेच लिंक लाईन याबाबत शासनस्तरावरून विविध मंजूरी मिळवल्या होत्या. त्यापैकी बहुतांश उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कर्जत तालुक्यातील घुमरी येथील २ कोटी २ लाख रुपये किमतीच्या ३३/११ केव्ही (5-MVA) नवीन वीज उपकेंद्राचे काम नुकतेच पूर्ण झाले असून आमदार रोहित पवार यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. 

घुमरी येथे नवीन वीज उपकेंद्र झाल्यामुळे परिसरातील घुमरी, थेरगाव, निमगाव गांगर्डा, बेलगाव व नागमठाण या गावातील शेतकऱ्यांना फायदा होणार असून पूर्वी असणाऱ्या मिरजगाव उपकेंद्रावरील ताण कमी झाल्याने गुरवपिंपरी, रवळगाव, चांदे, डिकसळ, रातंजन,गांदर्डी या गावांना अखंडित आणि उच्च दाबाने वीजपुरवठा होणार आहे. मिरजगाव उपकेंद्रावर अवलंबून असणाऱ्या गावांवर येणारा ताण देखील पूर्णपणे कमी झाला आहे व सध्या सर्व गावात पूर्ण आणि उच्च दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आमदार रोहित पवारांच्या प्रयत्नातून लिंक लाईन व उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून अनेक कामांना गती देखील मिळाली आहे. या व्यतिरिक्त  दोन्ही तालुक्यातील मिळून नायगाव, दिघोळ, चीलवडी,चौंडी व रत्नापुर येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून नवीन वीज उपकेंद्र मंजूर असून त्यापैकी नायगाव उपकेंद्राचे काम पूर्ण होऊन ते सुरू देखील झाले आहे. तसेच दिघोळ, चिलवडी, रत्नापुर व चौंडी येथील काम येत्या काळात सुरू होतील. यासोबतच राशीन, मिरजगाव, भांबोरा, खांडवी, कुळधरण आणि भानगाव येथील उपकेंद्राची क्षमता वाढवण्यासाठी देखिल मंजुरी याआधीच मिळाली असून येत्या काळात ते देखील काम सुरू होईल.

दरम्यान, एकूण 301 किमीच्या लिंक लाईनच्या कामाला आमदार रोहित पवार यांनी पाठपुरावा करुन शासनाची मंजुरी मिळवली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

नुकतेच घुमरी येथे नवीन वीज उपकेंद्राचे लोकार्पण आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पार पडले आहे. यासोबतच कर्जत तालुक्यातील 33/11 पाटेवाडी सबस्टेशन येथे ओव्हरलोडींगमुळे आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठ्यात मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. त्यामुळे आमदार निधीतून पाटेवाडी सबस्टेशन येथे 3 किलोमीटर लिंक लाईनचे काम देखिल पूर्वीच पूर्ण झाले आहे. नवीन उपकेंद्रामुळे सध्याच्या उपकेंद्रांवर आलेला ताण कमी होण्यास मदत होणार असून त्यावर अवलंबून असणाऱ्या गावांची विजेची अडचणही कायमची दूर होणार आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने आणि अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी आमदार रोहित पवार करत असलेल्या प्रयत्नातून आता शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

माझ्या मतदारसंघातील नागरिकांना व शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावं लागू नये यासाठी मी कायमच प्रयत्नशील असतो तसेच शेतकऱ्यांना होणाऱ्या तुटपुंज्या पुरवठ्याबाबतही मी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करून विविध ठिकाणी वीज उपकेंद्र लिंक लाईन इत्यादी कामे मंजूर करून आणले आहेत. त्यापैकीच घुमरी येथील उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण केले. त्याचा फायदा हा परिसरातील गावांबरोबरच पूर्वी वीजपुरवठा करत असलेल्या उपकेंद्रावरचा ताण कमी झाल्याने त्या उपकेंद्रावर अवलंबून असणाऱ्या गावांना देखील होणार आहे.

– आमदार रोहित पवार

3/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker