जामखेड पाठोपाठ कर्जतमध्येही आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रंगला दहीहंडी स्पर्धेचा दिमाखदार सोहळा.
फलटणच्या जय हनुमान गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत मिळवले पहिले पारितोषिक.

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार मित्र मंडळ कर्जत – जामखेडकर नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी एकत्र येत भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. जामखेड पाठोपाठ कर्जतमध्ये ही भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साहात पार पडला असून हजारोंच्या संख्येने नागरिक या दिमाखदार सोहळ्यासाठी उपस्थित होते. मुंबई पुणेसह महाराष्ट्राच्या विविध भागातून गोविंदा पथके या स्पर्धेसाठी कर्जतमध्ये दाखल झाली होती.
कर्जत शहरातील दादा पाटील महाविद्यालयाच्या मागील असलेल्या मैदानावर हा भव्य दहीहंडी उत्सव पार पडला असून या दहीहंडी स्पर्धेमध्ये फलटण येथील जय हनुमान गोविंदा पथकाने दहीहंडी फोडत पहिलं पारितोषिक पटकावला आहे यामध्ये 1 लाख 11 हजार 111 रुपये रोख व सन्मानचिन्ह असे बक्षिसाचे स्वरूप आहे.
तसेच कर्जत जामखेड गटासाठी देखील दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये कर्जत मधील सर्वसामाजिक संघटना यांना 21 हजार 111 रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस हा येत्या 29 सप्टेंबरला असून त्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसारच मतदारसंघातील महिला, मुली, युवा व अबालवृद्ध सर्वांच्याच साक्षीने हा दिमाखदार दही हंडी उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. अशा पद्धतीने स्पर्धा आयोजित केल्याने कर्जत जामखेड मतदारसंघ हा राज्यपातळीवर नावलौकिक प्राप्त करत आहे.