कर्जत नगरपंचायत मधील अनागोंदी कारभाराची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे नगरपंचायत कार्यालयास “टाळे ठोक आंदोलन” उपनगराध्यक्षा

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत नगरपंचायत मधील काही गोष्टीत तसेच टेंडर मध्ये तफावत जाणून आल्यामुळे व संशयास्पद स्थिती निर्माण झाल्याने कर्जत नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षा सौ. रोहिणी घुले पाटील यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे कळविले आहे. घुले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी दिनांक 14/08/2023 रोजी वरिल विषयाची रितसर लेखी स्वरुपात माहिती मिळण्यासाठी नगर पंचायत मधे मुख्याधिकारी यांना अर्ज केला होता. व त्यांनतर अनेक वेळा मोबाईल द्वारे मुख्याधिकारी यांना संपर्क साधला होता. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी संबंधित अधिकारी यांना तुम्हाला माहीती देण्यास सांगतो असे उत्तर मिळाले. परंतु तरी देखील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या कडून माहिती मिळाली नाही. व माहिती मिळेल याची खात्री दिसून येत नाही. त्यामुळे तब्बल एक महिना उलटून गेला परंतु अद्याप माहिती मिळाली नसल्यामुळे ज्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. त्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपनगराध्यक्षा सौ. रोहिणी घुले यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. तसेच नगरपंचायतच्या या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी नगरपंचायत कार्यालयाला युवक काँग्रेसच्या च्या वतीने उद्या दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता “टाळे ठोक” अंदोलन करण्यात येणार आहे. सर्व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थीत हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सौ. घुले यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत नगरपंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात आली आहे.