ब्रेकिंग
नामदेव थोरात यांची शरदचंद्र पवार गटाच्या कर्जत शहर युवक अध्यक्षपदी निवड

Samrudhakarjat
4
0
1
9
3
9
समृद्ध कर्जत / (प्रतिनिधी) :- कर्जत शहरामध्ये गेली १५ वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले आ. रोहित पवार समर्थक नामदेव थोरात यांची नॅशलॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या कर्जत शहर युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. थोरात यांनी ४ वर्षांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत येथे त्यांची निवड करण्यात आली.
यावेळी आ. रोहित पवार, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश सरचिटणीस संदीप वर्षे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, नगरसेवक नामदेव राऊत, सुनील शेलार, रविंद्र सुपेकर, विशाल मेहेत्रे यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.