शरदचंद्र पवार गट पक्षाच्या प्रथम शहराध्यक्षपदी प्रा. विशाल रामदास मेहेत्रे यांची निवड

समृध्द कर्जत (प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या प्रथम शहराध्यक्षपदी प्रा. विशाल रामदास मेहेत्रे यांची निवड करण्यात आली आहे.
दि.७ रोजी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवकचे जिल्हाध्यक्ष संदीप वर्पे पक्षाच्या कर्जत जामखेड येथील पदाधिकाऱ्यांचे उपस्थिती ही निवड जाहीर करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते प्रा. विशाल मेहेत्रे यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रा. विशाल मेहेत्रे यांचा निवडीचे तालुक्यासह कर्जत जामखेड मतदारसंघात सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. विशाल मेहेत्रे हे विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून आमदार रोहित पवार यांचे विश्वासू म्हणून पक्षात कार्यरत आहेत. यापूर्वी ते युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून काम पाहत होते. यावेळी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी चांगले काम केले. अभ्यासू उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व, वजनदार वक्तृत्व,विविध सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग यामुळे त्यांना मानणारा मित्रपरिवार मोठा आहे. रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या अध्यक्षपदाच्या काळात विविध कार्य, दादा पाटील महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी संघ, गेल्या सव्वा तीन वर्षापासून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात कार्यरत असलेल्या सर्व सामाजिक संघटना अशा विविध सामाजिक संघटनेत ते सहभागी आहेत. कर्जत नगरपंचायत मध्ये पक्षाची सत्ता आणण्यासाठी त्यांनी रोहित पवार यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम केले. उमेदवारी करण्याची इच्छा असताना देखील पक्षाने दिलेला आदेश मानून पक्ष्यांचे सर्व उमेदवारासाठी प्रचारात अग्रभागी होते.
रोहित पवारांचा निष्ठावान, विश्वासू शिलेदार म्हणुन विशाल मेहेत्रे यांची ओळख आहे.
पक्षाने माझ्यावर दिलेली जबाबदारी सार्थपणे पार पाडण्याकरिता मी पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार,आमदार रोहित पवार,पक्षातील ज्येष्ठ मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षातील सर्व कार्यकर्ते यांना बरोबर घेऊन काम करून आपल्या पदाला न्याय देईल असे यावेळी प्रा. विशाल मेहेत्रे म्हणाले.
कार्यकारिणीचा विस्तार लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रा.विशाल मेहेत्रे सर यांनी दिली.