पै.प्रविण घुले पाटील यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा घेतला निर्णय

कर्जत प्रतिनिधी : – मराठा समाजाला आरक्षण लागू करावे या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेले अमरण उपोषण या आमरण उपोषणाच्या कारणास्तव कर्जत तालुका तालीम संघाचे अध्यक्ष , मा. जिल्हा परिषद सदस्य व भारतीय जनता पक्षाचे नेते पै.प्रवीण घुले पाटील यांचा वाढदिवस दिनांक 3 नोव्हेंबर रोजी नेहमी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी
अमरण उपोषण सुरू केले आहे. मराठा समाजा प्रती जरांगे पाटील यांची तळमळ आणि जिद्द पाहून या वर्षी पै प्रविण घुले पाटील यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय प्रवीण घुले यांनी जाहीर केला आहे. तरी दिनांक 3 नोव्हेंबर रोजी माझ्या वाढदिवसा निमित्त कोणीही हार,
श्रीफळ, शाल, फेटे घेऊन येऊ नये. तसेच कोणत्याही कार्यकर्त्यांनी शुभेच्छा फलक सोशियल मिडीयातून शुभेच्छा देऊ नयेत असे आवाहन स्वतः पै. प्रवीण घुले पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. आणि या
भावनांचा आदर करुन या वर्षी माझा वाढदिवस साजरा करणार नाही. असे प्रवीण घुले यांनी जाहीर केले आहे. तरी सरकारने तात्काळ मराठा समाजाच्या भावना ओळखून ताबडतोब मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावे. अशी मागणी यावेळी घुले यांच्या वतीने करण्यात आली.
दि. 3 नोव्हेंबर 2023 रोजी होणारा माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही…. दरवर्षी माझ्यावर प्रेम करणारी वडीलधारी, मित्रवर्ग, सहकारी, हितचिंतक मला दिवसभर भेटून शुभेच्छारूपी आशीर्वाद देत असतात. आपण माझ्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छारूपी प्रेम व आशीर्वाद देऊन मला चांगले काम करण्याचे बळ देत असतात परंतु, सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरला आहे, त्याला समर्थन म्हणून मी माझा या वर्षी वाढदिवस साजरा करणार नाही. याची नोंद सर्व मित्र परिवाराने घ्यावी. मराठा समाजाला आरक्षण मिळावे,यासाठी मी पाठिंबा देत आहे.माझ्या वाढदिवसानिमित्त तालुक्यांसह पंचक्रोशीत सर्व कार्यक्रम रद्द करण्यास सर्व मित्र परिवारांना सांगितले आहे.माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी गावागावांत व शहरात कोणीही शुभेच्छा बॅनर लावू नयेत.तसेच सोशियल मिडीयातून शुभेच्छा देऊ नयेत. मला शुभेच्छा देण्यासाठी कोणीही कर्जतला येऊ नये.
पै.प्रविण घुले पाटील