पै. रोहित मोढळे यांनी कर्जत केसरीची गदा व बक्षिसांचे मानकरी

समृध्द कर्जत (प्रतिनिधी) :- कै. भास्करदादा गुलाबराव तोरडमल व कै. दिलीपनाना गुलाबराव तोरडमल यांच्या पुण्यतिथीनिमित्त विजय तोरडमल यांचे माध्यमातून शनिवारी कर्जत येथे भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले. या कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्र तसेच हरियाणा राज्यातील नामवंत मल्लांनी सहभाग नोंदवला. सर्व सामाजिक संघटना यांच्या हस्ते कुस्ती मैदानाचे उद्घाटन होऊन लहान मोठ्या कुस्त्यांना सुरुवात झाली.महाराष्ट्रातील दहा ते बारा महाराष्ट्र चॅम्पियन तसेच दोन उपमहाराष्ट्र केसरी या मैदानात लढले.
विशेष तुफानी लढत पै. शैलेश शेळके, उपमहाराष्ट्र केसरी विरुद्ध पै. प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी यांच्यात झाली. यामध्ये शैलेश शेळके यांनी प्रकाश बनकर हप्ते डावावर विजय मिळवला. कर्जत केसरी किताबासाठी पै. रोहित मोढळे विरुद्ध पै. धुळाजी ईरकर यांच्यामध्ये फायनलची कुस्ती झाली. त्यामध्ये रोहित मोढळे यांनी धुळाजी ईरकर यांनी विजय मिळवून कर्जत केसरीची गदा व ५१ हजार रुपये रोख रकमेचे पारितोषिक पटकावले. राजमुद्रा केसरी किताबासाठी पै. रामकृष्ण पोटरे यांनी दिल्लीच्या राकेश कुमारवर विजय मिळवला व राजमुद्रा केसरी किताबाचा मान मिळवला.
मनोरंजन कुस्तीमध्ये नेपाळ देशातील देवा थापा याने हरियाणाच्या सुमित कुमारवर विजय मिळवून मनोरंजन कुस्ती जिंकली. यासह संकुलातील अनेक मुलांनी दमदार कुस्त्या करून बक्षीसे मिळवली.
या मैदानासाठी पंचक्रोशीतील तसेच इतर जिल्ह्यातील प्रेक्षक कुस्ती मैदानासाठी आले होते. कुस्ती मैदानाच्या आयोजक विजय तोरडमल यांनी प्रेक्षकांसाठी भव्य दिव्य गॅलरी उभारली होती. मैदानासाठी कुस्ती संकुलाचे वस्ताद ईश्वर तोरडमल पैलवान धर्म परदेशी, वैभव सुपेकर, पै. किरण नरवडे, सचिन जाधव, अप्पू लाळगे, अशोक तोरडमल, बच्चन मांडगे, रमेश गांगर्डे तसेच अनिल तोरडमल, रमेश तोरडमल, डॉ. डॉ. राजेश तोरडमल, अमित तोरडमल या बंधूंनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तोरडमल परिवाराकडून सर्व देणगीदारांचे आभार मानण्यात आले.