डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राशीन सकल मुस्लिम समाजाच्यावतीने भीमसैनिकांना सरबत वाटप.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राशिन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारापासून २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.प्रथमता प्रतिमेचे पूजन राशीनच्या लाेकाभिमुख सरपंच नीलम भीमराव साळवे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भीमराव साळवे, रामकिसन साळवे, कॉन्ट्रॅक्टर मतीन शेख, बबलू भाई कुरेशी, शरीफ कुरेशी, इतर भीमसैनिक व ग्रामस्थड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिमरायांच्या गाजलेल्या गाण्यांच्या तालावर ठेका धरत, विद्युत रोषणाई व फटाकड्याची अतिषबाजी करीत भीमसैनिकांनी भीम जयंतीचा आनंद उत्सव साजरा केला. मिरवणूक महात्मा ज्योतिबा फुले चौकात येतात मुस्लिम समाजाच्या वतीने सामाजिक भाईचारा व एकोपाचा संदेश देत भीमसैनिकांना व इतर नागरिकांना थंडगार शरबतचे वाटप मोहसीन काझी, शोएब काझी, सद्दाम काझी, उस्मान कुरेशी सोहेल जहागीरदार, अन्वर जहागीरदार, समीर तांबोळी व इतर मुस्लिम समाजाच्या उपस्थितीत शरबत चे वाटप करण्यात आले.
यावेळी असंख्य भीमसैनिकांनी थंडगार शरबतचा आस्वाद घेतला. मिरवणूक मुख्य बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यावर महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भीमराव साळवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करीत भीमसैनिकांचे ग्रामस्थांचे तसेच चोक बंदोबस्त ठेवल्यामुळे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे व स्टॉप चे आभार व्यक्त केले तर ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे यांनी प्रस्थाविक केले या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीची सांगता करण्यात आली.