दौंड उस्मानाबाद रस्त्याच्या नावाखाली रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांची अधिकारी व ठेकेदाराकडून फसवणूक होण्याची दाट शक्यता.

राशीन( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन मुख्य बाजारपेठेतून दौंड उस्मानाबाद राज्य मार्ग ६८ चे चिलवडी ते सिद्धटेक दहा मीटर रुंदी असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू झाले असून मुख्य बाजारपेठेतून सर्व दुकानदारांना विश्वासात घेऊन काम होत असलेले दिसत आहे परंतु राशीन गावाच्या बाहेर मात्र दहा मीटर सिमेंट काँक्रीट रस्ता असून देखील रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांची अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून रस्त्यालगत असणाऱ्या शेतकऱ्यांशी विचार पुस किंवा कसल्याही प्रकारची अधिसूचना न देता रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत अधिकारी व ठेकेदार अरेरावाची भाषा वापरीत रस्त्यालगत शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांची लूट करण्याचा प्रयत्न करीत असून सदर रस्त्याबाबत माहिती व इस्टिमेंट बाबत समृद्ध कर्जत चे पत्रकार जावेद काझी यांनी येथे उपस्थित असणाऱ्या लिंबाजी बाळासाहेब पवार यांना सुरू असलेल्या कामा संदर्भात माहिती विचारली असता आपण आरटीआय द्वारे माहिती घेऊ शकता असे सांगत रस्ता दहा मीटरचा काँक्रिटीकरण असून रस्त्याच्या दोन्ही साईटने एक मीटरची मुरूम पट्टी, दोन्ही साईटचा स्लाेप, गटार असे सांगून अधिक बोलणे टाळले याचाच अर्थ जर दहा मीटरचा सिमेंट काँक्रीट रस्ता होणार आहे मग सध्याचा रस्ता सोडून तसेच आणखी जास्त रस्त्याचा वापर करून देखील लगतच्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणून बुजुन अधिकारी व ठेकेदार संगमताने शेतकऱ्यांची लूट करताना दिसत आहेत तसेच काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नांदणी नदीवरून शेतीसाठी पाईपलाईन केलेल्या आहेत तसेच नजीक असलेल्या सरोदे वस्तीवरील पिण्याचे पाण्याची पाईपलाईन देखील ह्या अधिकाऱ्यांनी व ठेकेदाराने कोणतेही परवानगी न घेता तोडलेली आहे.
अशा अनेक घटना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याकडून होत आहेत. वेळीच यांना जरब बसावा तसेच संबंधित वरिष्ठांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबवावी
तसेच यासंदर्भात माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी वाकचौरे व राशीन अभियंता वाघमारे यांना अनेक वेळा फोन करून देखील दोघेही कालपासून फोन उचलत नसल्यामुळे योग्य ती माहिती जावेद काझी यांना मिळालेली नाही तरी सदरच्या रस्त्याची पूर्ण माहिती लेखी स्वरूपात मिळावी. किती कोटीचे हे काम आहे याबाबत संबंध अधिकाऱ्यांनी माहिती द्यावी. तसेच रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन सदर रस्त्याचे काम मार्गी लावावे. असे रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे म्हणने आहे.