कर्जतमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिला उमेदवाराचा आमदार रोहित दादा पवार यांच्या ‘सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलला’ पाठिंबा
मांदळी येथील हौसराव गांगर्डे यांनीही काही दिवसांपूर्वी दिला पाठिंबा

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांचे वारे वाहत असून प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीमध्ये नुकत्याच कर्जत तालुक्यातील सौ.पूजा नितीन जगधने या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार रोहित दादा पवार यांच्या पॅनलला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
आपल्या पॅनलची विचारधारा पटल्यामुळे मी माझा आणि वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आपल्या पॅनलला जाहीर करत असल्याचे त्यांनी पत्र आमदार रोहित दादा पवार यांना देऊन जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
कोणत्याही राजकीय दबावाविना आपण पाठिंबा देत असल्याचं यावेळी त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. यापूर्वी देखील श्री क्षेत्र मांदळी तालुका कर्जत येथील हौसराव अंबादास गांगर्डे यांनी आमदार रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या ‘सहकार व शेतकरी विकास आघाडी पॅनलला’ जाहीर पाठिंबा दर्शवला होता.