राशीन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भूखंडाचे वाटप व भूमिपूजन शुभारंभ.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- राशीन येथे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये वाटप पत्र करीत भूमिपूजन करीत पत्र वाटप करण्यात आले. हा सर्व कार्यक्रम पंचायत समिती सभापती काकासाहेब तापकीर यांच्या उपस्थित संपन्न झाला. सर्व शेतकरी बांधवांना एकत्र सर्व खरेदी विक्री करता येऊ शकेल असे व्यापारी संकुल या ठिकाणी व्यापारी बांधवांच्या माध्यमातून उभारले जाणार आहे. यामुळे राशीन व परिसरातील बाजारपेठेमध्ये व्यावसायिक दृष्ट्या मोठी भर पडली जाणार आहे.
अशी माहिती राशीन अडत व्यापारी व्यापारी तसेच व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष दत्तात्रय झगडे व नामांकित अडत व्यापारी रमेश सायकर यांनी दिली .याप्रसंगी बोलताना झगडे म्हणाले. सर्व व्यापाऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कर्जत राशीन या ठिकाणी दिलेला शब्द पाळत सर्व व्यापाऱ्यांना गाळे वाटप केले आहे. याबद्दल त्यांचे आभार मानले. परंतु इथून पुढे देखील असेच सहकार्य करावे व कागदोपत्री पूर्तता करावी जेणेकरून कुठल्याही बँकेत दाखवल्यास त्यांनी आम्हाला लोन पुरवठा केला पाहिजे. सर्व संचालक मंडळांनी नेहमी सहकार्याची भावना ठेवावी जेणेकरून व्यापार कसा वाढेल याकडे लक्ष केंद्रित करावे. व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समिती मिळून संगमने काम करू. तर नामवंत अडत व्यापारी रमेश सायकर म्हणाले की राशीन भिगवन रोडवर पाण्याच्या टाकी समोर कृषी उत्पन्न बाजार समिती भुखंडाचे वाटप भूमिपूजन शुभारंभ प्रसंगी सभापती काकासाहेब तपकीर उपसभापती संचालक मंडळ व इतर शेतकऱ्यांचे आभार मानले. इथून मागे अडत दुकानदारांना चाळण करणे, माल स्वच्छ करणे, गाडी लावणे इतर अनेक अडचणी येत असत, मागील निवडणुका वेळी जे आश्वासने दिली गेली त्याची पूर्तता करत भूमिपूजन झाले असल्याची माहिती रमेश सायकर यांनी दिली तसेच एक महिन्याच्या आत आम्ही सर्व बांधकाम सुरू करत आहोत, एक ते दोन महिन्यानंतर मार्केटनेही कागददोपत्री पूर्तता केली पाहिजे. जेणेकरून कुठल्याही बँकेचे लोन आम्हास सहजासहजी मिळू शकेल.
याबाबत आम्हीही कागदप त्री सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत त्यांनीही सहकार्य करावे असे मनोगत रमेश सायकर यांनी व्यक्त करत शुभारंभ प्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचे, शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे, ग्रामस्थांचे रमेश सायकर यांनी आभार मानले. यावेळी काकासाहेब तापकीर, दत्तात्रय झगडे, उत्तम काळे, राकेश भंडारी, रमेश सायकर, प्रवीण शिरसकर, संकेत दोशी, महेंद्र जंजिरे,, बालाजी जंजिरे, जय राम पवार, प्रशांत काळे, किशोर काका मंडलेचा, इतर अडत दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.