जगदंबा विद्यालय राशीनची कु. राजनंदिनी मोढळे गोळाफेक स्पर्धेत तालुक्यातून प्रथम विद्यालयाच्या वतीने भव्य सत्कार.

राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. :- कर्जत तालुक्यातील रेहकुरी येथे शनिवार दिनांक 30 सप्टेंबर २०२३ .रोजी तालुकास्तरीय गोळा फेक स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेचे श्री जगदंबा विद्यालययाची इयत्ता ९ वी वर्गात शिकत असलेली विद्यार्थिनी कु. राजनंदिनी बाळासाहेब मोढळे राहणार राशीन नजिक मोढळे वस्ती हिने १७ वर्षीय विद्यार्थिनी वयोगटातील गोळा फेक स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून राजनंदिनी हिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल श्री जगदंबा विद्यालयाच्या वतीने राजनंदिनी हिचा मिळालेला बहुमोल यशाबद्दल पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य खंडागळे सर, पर्यवेक्षक राजेंद्र साळवे सर, दत्ता नेवसे सर,, स्कूल कमिटी सदस्य, राजनंदिनी चे पिता बाळासाहेब मोढळे, शिक्षक ,कर्मचारी वर्ग व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजनंदिनीला या मिळालेल्या यशाबद्दल राशिन व परिसरातून अभिनंदन व्यक्त करीत कौतुकाचा वर्षाव होत आहे.