पावसाच्या पाण्याने कुरणाचीवाडी रस्ता जलमय शालेय मुले व नागरिकांचे हाल राशीन ग्रामपंचायतला मुरमीकरण करण्याबाबत मागणी.

राशिन (प्रतिनिधी )जावेद काझी :- राशीन ग्रामपंचायत अंतर्गत वार्ड क्रमांक ६ मधील कुरणाची वाडी -राशीन खड्डेमय खराब रस्ता पावसाच्या पाण्यामुळे जलमय झाला असून शाळेतील मुलांना तसेच येणाऱ्या जाणाऱ्या इतर नागरिकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्या संदर्भात राशीन ग्रामपंचायतला वेळोवेळी मुरमीकरण करण्याबाबत सूचना देऊन देखील अद्याप या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आलेला नाही.
सध्या सतत धार पाऊस चालू असल्यामुळे शाळेतील मुलांचे व इतर नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून खराब रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे येथील ये जा करणाऱ्या नागरिकांना व शालेय मुलांना नाहाक त्रास सहन करावा लागत आहे वेळोवेळी सांगून देखील अद्याप या रस्त्याघर मुरमीकरण झालेले नसून या रस्त्यावर तात्काळ मुरूम टाकून खड्डे बुजवण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामपंचायत सदस्य राम कानगुडे, अशोक जंजिरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष पांडुरंग भंडारे यांनी दिला आहे.