बदलापूर क्रूर घटनेच्या निषेधार्थ राशीन बंदला संमिश्र प्रतिसाद

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी . महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे शाळेतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या क्रूर घटनेच्या निषेधार्थ,राशीन येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी विविध पक्ष व संघटनांच्या वतीने अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ निषेध सभा आयोजित करण्यात आली.
शनिवार दिनांक २४/८/२०२४ दिवसभर रोजी राशीन गावातील व्यवहार व दुकाने संमिश्र बंद ठेवत सर्वांनीच तीव्र शब्दात निषेध नोंदवला यावेळी श्री जगदंबा विद्यालय राशीन च्या शालेय मुलींची झालेल्या क्रूर घटनेच्या निषेधार्थया गावातून फेरी काढण्यात आली.
यादरम्यान देशमुख वाडीचे माजी उपसरपंच मालोजीराजे भिताडे, शिवसेनेचे सुभाष जाधव, मराठा महासंघाचे गणेश कदम, मुन्ना मुंडे, मयूर धनवडे, औदुंबर देवगावकर, नितीन कानगुडे, रावसाहेब पंडित, बापू धोंडे कॉन्ट्रॅक्टर ,व्यापारी असोसिएशनचे अजिनाथ मोढळे, यांची भाषणे झाली. यावेळी राशीन गावातील श्री जगदंबा विद्यालयातील शिक्षक,सर्व विद्यार्थिनी,व्यापारी बांधव,परिसरातील ग्रामस्थ,विविध संघटनांचे पदाधिकारी,पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.