दुर्गंधीयुक्त कचऱ्याने भरलेली गटारी साफ करा राशिन शिवसेनेचा बांधकाम विभागाला इशारा.

राशीन (प्रतिनिधी):- जावेद काझी.राशीन येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकात दौंड उस्मानाबाद राज्य मार्ग ६८ रस्त्यालगत दोन्ही बाजूने ड्रेनेज लाईन(गटार) झालेली आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग व कॉन्ट्रॅक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे त्या गटारीत पावसाचे पाणी जमा होऊन दुर्गंधीयुक्त, कचऱ्याने भरलेल्या गटार खड्ड्यामध्ये अळ्या झाले आहेत.
याविषयी शिवसेनेच्या शिंदे गटाचे कर्जत तालुका प्रमुख बापूसाहेब नेटके, जिल्हा परिषद गटप्रमुख विकास काळे, राशीन शहर प्रमुख दीपक जंजिरे यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी वाकचौरे, वाघमारे, यांना वेळोवेळी यासंदर्भात फोन करून या विषयी वारंवार माहिती देऊन देखील अद्याप काही गटार स्वच्छतेचे काम झाले नव्हते परंतु आज सकाळी या दुर्गंधीयुक्त गटारीचा बातमीसाठी फोटो काढतात सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांना जाग आली व लगेच जेसीबीच्या साह्याने दुर्गंधीयुक्त कचरा व आल्याने भरलेली गटार तात्पुरती मातीच्या साह्याने बंद करण्यात आली आहे.
तरी तसे न करता सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांनी संगमताने पावसाच्या पाण्याने भरलेले गटारी स्वच्छ करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा जहरी इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख दीपक जंजिरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी व ठेकेदार यांना दिला आहे.