नांदेड जिल्ह्यातील दलित तरुणाच्या व इतर झालेल्या हत्येप्रकरणी राशीन मध्ये आरपीआयचा मोर्चा पोलीस निरीक्षकांना निवेदन.

कर्जत (प्रतिनिधी) :- नांदेड जिल्ह्यातील बोंडर हवेली येथील दलित तरुणाच्या हत्याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राशिन यांच्यावतीने मुख्य बाजारपेठेतून मोर्चा पोलीस दूर शेत्र राशीन येथे काढण्यात आला. दलित तरुणाची हत्या करणाऱ्या व मुंबईत निर्भयाची अत्याचार करून हत्या केलेल्या आरोपीचा खटला जलद गतीने न्यायालयात चालवावा. पीडिताच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देऊन, प्रत्येकी 50 लाखाची आर्थिक मदत घोषित करावी सर्व गुन्ह्यातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी शनिवारी आरपीआयच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यामध्ये आरपीआयचे तालुका अध्यक्ष संजय भैलूमे, युवक तालुकाध्यक्ष भीमराव साळवे, रामकिसन साळवे, संजय चव्हाण, राशिन शहराध्यक्ष नितीन साळवे, ग्रामपंचायत सदस्य अतुल साळवे, मुकुंद आढाव, सचिन साळवे, विकी साळवे, नवनाथ साळवे, दिलीप साळवे, आदी भीमसैनिक व ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंबेडकर जयंती साजरी केल्याच्या रागातून नांदेड बाेंडार मध्ये अक्षय भालेराव ची हत्या करण्यात आली. लातूर रेनापुर येथे सावकार दिन तीन हजारासाठी गिरीरत्न तबकाले या तरुणाची हत्या केली,
मुंबईत सावित्रीबाई फुले वस्तीगृहात शिकत असलेल्या निर्भयाची बलात्कार करून हत्या करण्यात आली, तसेच केज येथे ऊसतोड कामगाराच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, या सर्व घटकांची सीबीआय, सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी व सदरचा खटला दलद गतीने न्यायालयात चालविण्यात यावा आदी मागण्या निवेदन द्वारे सरकारकडे करण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्यावतीने संपत शिंदे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.