प्राथमिक आरोग्य केंद्र राशिन येथे ऑपरेशन साठी डॉक्टररांन कडून पैशाची मागणी.

राशीन( प्रतिनिधी )जावेद काझी. :- प्राथमिक आरोग्य केंद्र राशीन येथे बुधवार दिनांक ७.६.२०२३. रोजी महिलांचे कुटुंब नियोजन चे व इतर जवळपास 64 ऑपरेशन्स झाले. या ऑपरेशन साठी बीड येथून तज्ञ डॉक्टर आले होते प्रत्येक ऑपरेशन धारकांकडून तीन हजार रुपये पैसे घेतले अशा तक्रारी आमच्याकडे आले असल्याने घडलेल्या प्रकाराची शहानिशा करून या संबंधित राशीन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. व्हरकटे यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. तसेच राशीन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दप्तरी ऑडिट तपासणी होऊन आलेल्या सर्व औषधांची आवक जावक रजिस्टर तपासणी व्हावी तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर व्हरकटे जमविलेलया बेकायदेशीर मालमत्तेची तात्काळ चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र दामोदर यांनी उप जिल्हा विभागीय आरोग्य अधिकारी कर्जत यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याबाबत डॉक्टर व्हरकटे यांच्याशी विचारना केली असता चुकीची तक्रार आहे
असे सांगत सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना खाजगी रुग्णालयात ऑपरेशन करणे महागात पडते त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या तांत्रिक तपासणीचा खर्चच पेशंट कडून घेतला जात असून खाजगी डॉक्टरला आरोग्य विभागाकडून प्रत्येक ऑपरेशन मागे फक्त शंभर रुपये प्रत्येकी मिळतात. असे व्हरकटे यांनी सांगितले. तसेच डॉ.व्हरकटे यांची याबाबत चौकशी करून कार्यवाहीचा लेखी अहवाल तात्काळ मिळावा अशी मागणी रवींद्र दामोदर यांनी केली आहे.