वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुक्याच्या वतीने राशिन येथे पक्षाची सभासद नोंदणी अभियान संपन्न.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी :- राशीन येथे वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पक्षाची सभासद नोंदणी अभियान शुक्रवार दिनांक१७. ३.२०२३ रोजी दुपारी ३ ते सायंकाळ ७ वाजेपर्यंत सभासद नोंदणी अभियान राबवण्यात आले यावेळी राशिन गावातून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला सर्व कार्यकर्त्यांनी रांगेत उभा राहून सभासद नोंदणी करून घेतली त्यांना लगेच वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वतीने प्रमाणपत्र ही वाटप करण्यात आले दुपारी ३ ते ७ या वेळेत तब्बल सुमारे १०० पेक्षा अधिक सभासदांनी नोंदणी करून प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी कर्जत तालुका अध्यक्ष पाेपट शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले या अभियानास जिल्हा सचिव नेटके सर, संघटक गाडे सर, तालुका सचिव अंकुश साळवे, डिगांबर कांबळे गुरुजी, रामदास घोडके गुरुजी, सोनू गजरमल संदीप आढाव(संघटक) राशिन शहराध्यक्ष दादा आढाव व वंचित बहुजन आघाडीचे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राजकुमार घोडके यांनी आगामी काळात पक्षाची ध्येय, धोरणे व बांधणी बाबत आपले मनोगत कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केले.