समृद्ध कर्जतच्या वेळोवेळी दिलेल्या बातमीमुळे परीटवाडी रस्त्याच्या कामाला गती: सरपंच विलास काळे.

कर्जत (प्रतिनिधी) :- माननीय आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रयत्नातून व शुभ हस्ते दिनांक २.४.२२ रोजी अंदाजे किंमत २९२,०० लक्ष चा भूमिपूजन शुभारंभ होऊन देखील राशीन परीट वाडी करपडी मोहिते वस्ती जिल्हा हद्द रस्त्याचे डांबरीकरणाचे अद्याप बंद पडलेले काम समृद्ध कर्जत च्या वेळोवेळी दिलेल्या बातमीमुळे, मार्गी लागले असल्याची माहिती परीटवाडीचे सरपंच विलास काळे यांनी रस्त्याच्या पाहणी दरम्यान आपले मनोगत व्यक्त केले सध्या रस्त्या वर खडी अंथरण्याचे काम चालू असून आठवड्याभरात डांबरीकरणाचे काम पूर्ण होईल अशी माहिती कॉन्ट्रॅक्टर लाळगे यांनी दिली,
या रस्त्याच्या कामाच्या पाठपुराव्यासाठी वेळोवेळी सरपंच काळे, व परीट वाडीकरांचे बहुमोल योगदान लाभले, आज काम सुरू झाले असताना स्वतः पाहणी करताना सरपंच विलास काळे, युवराज कदम, अवधूत काळे, पै. शिवाजी काळे, संकेत काळे, शरीफ भाई काझी, अविनाश मासाळ, आबा कदम, विशाल पवार, किरण गवळी, सनम गवळी, रुपेश साबळे, विश्वनाथ काळे व इतर परीट वाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.