आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड विमा योजना ऑनलाइन प्रक्रिया राशीन ग्रामपंचायत मध्ये सुरु पहिल्याच दिवशी ग्रामस्थांचा उतुंग प्रतिसाद.

राशीन (प्रतिनिधी) जावेद काझी.:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेलीआयुष्यमान भारत गोल्डन कार्ड आरोग्य विमा ऑनलाइन प्रक्रिया योजना राशिन ग्रामपंचायत मध्ये आज पासून सुरू करण्यात आली
असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पहावयास मिळाला यावेळी ग्रामविकास अधिकारी रोहिदास कापरे, ग्रामपंचायत सदस्य दीपक थोरात, कॉन्टॅक्टर अंबादास जाधव , विखे पाटील यांचे राशिन समन्वयक अमोल शेटे . संगणक आपरेटर विकास सायकर इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या विमा कार्डमुळे पाच लाखापर्यंत चा आरोग्य विम्याचा लाभ सर्वसामान्य कुटुंबातील गरीब गरजू मध्यमवर्गीय नागरिकांना आरोग्यदृष्ट्या घेता येईल. या कार्डमुळे शरीरातील विविध आरोग्य विषयक मेजर ऑपरेशन मोफत स्वरूपात होण्यास मदत होणार आहे. राशीन ग्रामपंचायत परिसरात या योजनेचा लाभ जवळपास सात हजार नागरिकांना घेता येणार आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल, व रेशन कार्ड ऑनलाइन असणे बंधनकारक आहे, तरी राशीन व पंचक्रोशीतील नागरिकांनी आयुष्यमान भारत गोल्डन विमा कार्ड योजने च्याऑनलाइन प्रक्रियेसाठी ग्रामपंचायत कार्यालय राशिन येथे संपर्क साधावा.