राशिन मध्ये मलेरिया डेंगू प्रतिबंधक फवारणी करावी तसेच सप्तपर्णी आरोग्य घातक झाडे तात्काळ तोडावी अल्लाउद्दीन काझी यांची निवेदनाद्वारे मागणी.

राशीन (प्रतिनिधी)जावेद काझी. :- राशीन गावामध्ये सहा ते सात दिवसापासून मलेरिया डेंगू या रोगांची साथ चालू आहे. यामुळे राशीन शहरांमधील सर्व दवाखाने या आजाराने गच्च भरले असून मलेरिया डेंगू चे आणखी प्रमाण व पेशंट वाढण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रतिबंधक उपाय म्हणून राशिन ग्रामपंचायत च्या वतीने मलेरिया,डेंगू, रोग प्रतिबंधक फवारणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच राशीन गावामध्ये जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा, गणेश मेडिकल समोर, ब्राह्मण गल्ली, नष्टे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक व मुख्य ग्रामपंचायत ने लावलेली रस्त्यावरील सप्तपर्णीची झाडे डॉक्टरांच्या मते आरोग्यास घातक असल्यामुळे या झाडांच्या सहवासात जास्त वेळ राहिल्यास डोकेदुखी, मळमळ होणे, उलटी, श्वास घेण्यास त्रास होणे अस्वस्थ वाटणे यासह विविध विकारांना शाळेतील मुलांना व इतर ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. शहरात ठीक ठिकाणी सप्तपर्णी झाडे लावण्यात आली असून त्यामुळे नागरिकासह इतर रुग्णांना त्रास वाढला आहे. त्यामुळे राशीन ग्रामपंचायत ने अशा आरोग्य घातक झाडांचा तात्काळ बंदोबस्त करावा. तसेच मलेरिया डेंगू ची प्रतिबंधक फवारणी तात्काळ राशीन गाव मध्ये सर्वत्र करून घ्यावी. अशी मागणी माजी सरपंच अल्लाउद्दीन काझी यांनी राशीन ग्रामपंचायतला निवेदनाद्वारे केली आहे.