कुंभेफळ,धांडेवाडी,नेटकेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महायुतीच्या सौ.प्रियांका संतोष धुमाळ

कर्जत प्रतिनिधी : – कर्जत तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजली जाणारी कुंभेफळ, धांडेवाडी, नेटकेवाडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये चुरशीच्या लढाईत ही ग्रामपंचायत महायुतीच्या ताब्यात आली असून या झालेल्या निवडणुकीत सरपंच पदी युवा उद्योजक संतोष (पप्पू) धुमाळ यांच्या पत्नी प्रियांका संतोष धुमाळ यांनी १०४५ मते घेऊन बाजी मारत सरपंचपद पटकावले आहे.
प्रियंका धुमाळ यांनी प्रतिस्पर्धी सोनाली विलास धांडे यांच्यावर १०९ मताने विजय मिळवला आहे. प्रियंका धुमाळ यांना १०४५ मते तर सोनाली धांडे यांना ९३६ मते पडली.
प्रियंका संतोष धुमाळ यांनी अगोदर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.परंतु राजकीय घडामोडी नंतर महायुतीच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविण्यात आली आणि चुरशीच्या लढतीत दहा पैकी नऊ जागा जिंकून कुंभेफळ,धांडेवाडी आणि नेटकेवाडी ग्रुप ग्रामपंचायत मध्ये दणदणीत विजय मिळविला.या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते .थेट जनतेतून सरपंच निवडणार असल्यामुळे सरपंच कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते .
या वेळी सरपंच पदासाठी कर्जत येथील शिवमिल्क दूध संघाचे संचालक ,व युवा उद्योजक संतोष उर्फ पप्पूशेठ धुमाळ यांच्या पत्नी प्रियंका धुमाळ यांनी चांगली लढत देत विजयश्री खेचून आणली . यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रियंका धुमाळ म्हणाल्या की मी यापूर्वी या ग्रामपंचायत मध्ये सदस्य म्हणून चांगले काम केले होते. त्यामुळे कामाचा अनुभव व मतदारांचा आशीर्वाद पाठीशी होता. आणि आता पुन्हा मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला काम करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे या ग्रुप ग्रामपंचायतला कर्जत तालुक्यातील एक आदर्श ग्रामपंचायत करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. या ग्रामपंचायत मध्ये मी सदस्य म्हणून काम केले असल्यामुळे या परिसरातील सर्व समस्यांची मला जाणीव आहे. आणि खास करून मी महिला असल्यामुळे महिलांच्या प्रश्नांची जाण आहे. आणि ते प्रश्न सोडण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करणार आहे .आगामी काळात महायुतीच्या सर्व नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून विकासात्मक कामे करणार आहोत. असे प्रियांका धुमाळ यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
विजयी उमेदवार पुढील प्रमाणे कुभेफळ १) शेख जाहीर इन्नुस यांना २७४ मते २) धोदाड अश्विनी भाऊसाहेब यांना ३२४ मते ३) धोदाड मिनल रणजित२६६ मते
नेटकवाडे १) कवडे अनिल वसंत ३७२ मते २) दळवी श्रीराम दशरथ ३६४ मते ३) नेटके कृष्णाबाई हनुमंत ३२२ मते
धांडेवाडी १) धांडे ऋषिकेश बप्पाजी ४२१ मते २)धांडे प्रेमो आण्णा ४४३ मते ३) सावंत दिपाली अनिल ४४० मते असे मते मिळवून वरील उमेदवार निवडून आले आहेत.