दौंड उस्मानाबाद रस्त्याचे काम कासव गतीने, नागरिक धुळीने त्रस्त.

जावेद काझी, राशीन (प्रतिनिधी) :- राशीनच्या मुख्य बाजारपेठेतून चाललेले दौंड उस्मानाबाद रस्त्याचे काम जवळपास एक महिन्यापासून बंद झाले असून खोदकाम केलेल्या ड्रेनेज लाईन मुळे संपूर्ण रस्त्यावर मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या रस्त्यावर धुळीचे प्रमाण अधिक वाढले असल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून सर्दी, खोकला, घसा, डोळे दुखणे ,व इतर आजारराना या रस्त्यावरील दुकानदारांना, व्यापाऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तसेच सध्या चाललेल्या रस्त्याचे काम अरुंद असल्यामुळे राशीन मुख्य बाजारपेठेतील रस्ता आणखीनच रुंद करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
यामुळे आमदार रोहित पवार यांनी स्वतः लक्ष घालून राशिन येथे उपस्थित राहून नागरिकांना दुकानदारांना व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन सर्वानुमते धुळखात रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा. रस्त्याच्या कामाच्या समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकार्यांना समज देऊन नागरिकांनाच्या समस्या लक्षात घेता आमदार रोहित पवार यांनी तात्काळ लक्ष घालून दौंड उस्मानाबाद रस्त्याचे बंद पडलेले काम जलद गतीने सुरू करावे. तसेच गावातून वाहतुकीस वारंवार येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात .अशी मागणी राशीनकरांच्या वतीने जोर करू लागली आहे.