दादा पाटील महाविद्यालयाच्या पाच कुस्तीपट्टूंची आंतरविभागीय (विद्यापीठ) स्पर्धेमध्ये निवड

कर्जत (प्रतिनिधी) :- शेवगाव येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये दादा पाटील महाविद्यालयाचे कुस्तीपटू आकाश तोरडमल (६० किलो वजनी गट) व हर्षवर्धन पठाडे (८७ किलो वजनी गट) यांनी यश संपादन केले. दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे संपन्न होणाऱ्या आंतरविभागीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेकरिता त्यांची निवड झाली आहे.
श्रीगोंदा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये सोनाली मंडलिक (६५ किलो वजनी गट), ऋतुजा बरडे (५९ किलो वजनी गट) व ऋतिका बरडे (५५ किलो वजनी गट) यांनी यश मिळवलेले आहे. मु. सा. काकडे कॉलेज, सोमेश्वरनगर येथे संपन्न होणाऱ्या आंतरविभागीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेकरिता या कुस्तीपटूंची निवड झालेली आहे
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक संचालक डॉ. संतोष भुजबळ, क्रीडा शिक्षक प्रा. शिवाजी धांडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.