google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

कर्जतच्या बाजारतळावरील जागेचा वाद चिघळला; २० ऑक्टोबरपर्यंत अतिक्रमण हटविण्याची मागणी

Samrudhakarjat
5 2 2 1 1 0

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत शहरातील बाजारतळ परिसरातील गावठाण येथे अतिक्रमणाच्या प्रश्नावरून वातावरण तापले असून, सुमारे ५० वर्षांपूर्वी शासनाने दिलेल्या जागेवरील कथित बेकायदेशीर अतिक्रमण हटवून देण्याच्या मागणीसाठी बाळासाहेब बापूराव जाधव यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. संबंधित जागेवरील अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी त्यांची मागणी असून, या प्रकरणामुळे महसूल प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

जाधव यांनी उपविभागीय अधिकारी, कर्जत विभाग यांना दिलेल्या निवेदनानुसार, मौजे कर्जत येथील बाजारतळ गावठाण परिसरात शासनाने १९५० मध्ये कबुलायतअंतर्गत जागा दिल्याचा त्यांचा दावा आहे. या जागेवर अंबादास शंकर पिसाळ यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदर अतिक्रमण हटविण्यासाठी महसूल प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न निकाली न निघाल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणात जाधव कुटुंबीयांनी संबंधित जागेच्या खरेदीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित जागा नेमकी कशी खरेदी करण्यात आली, यासंदर्भातील कागदपत्रे प्रशासनासमोर सादर करावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. जागेच्या मालकीसंदर्भातील कागदपत्रे, महसुली नोंदी आणि प्रत्यक्ष ताब्याची स्थिती तपासून प्रशासनाने वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी त्यांची भूमिका आहे.

संबंधित जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत कार्यवाही करण्याची मागणी जाधव यांनी केली होती. या प्रश्नावर त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, संबंधित अतिक्रमण २० ऑक्टोबरपर्यंत हटविण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे कळविल्याचे जाधव यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणात प्रशासनाकडून निर्धारित मुदतीत प्रत्यक्ष कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासनाने दिलेल्या जागेवरील कथित अतिक्रमण, जागेच्या खरेदीबाबत उपस्थित झालेले प्रश्न आणि मालकी हक्कासंदर्भातील कागदपत्रे या मुद्द्यांवरून हा वाद ऐरणीवर आला आहे. संबंधित कागदपत्रांची पडताळणी करून प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता २० ऑक्टोबरपर्यंत अतिक्रमण हटविण्याबाबत कोणती कार्यवाही होते आणि जाधव कुटुंबीयांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे…

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker