google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

आमदार रोहित पवार अचानक अस्वस्थ; मानेवाडी येथील सांत्वन भेट घेऊन पुढील दौरा केला रद्द

Samrudhakarjat
5 2 1 4 9 3

(कर्जत प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते आणि कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पवार यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपले पुढील सर्व नियोजित दौरे रद्द केले आहेत. प्रकृती खालावलेली असतानाही त्यांनी कर्जत तालुक्यातील मानेवाडी येथील आपली पूर्वनियोजित सांत्वन भेट पूर्ण केली, मात्र त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील प्रवास थांबवण्याचा निर्णय घेतला…


मानेवाडीत घेतली सांत्वन भेट मिळालेल्या माहितीनुसार, आमदार रोहित पवार यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये मानेवाडी येथील एका कुटुंबाची सांत्वन भेट समाविष्ट होती. शरीरात कमालीचा थकवा आणि अस्वस्थता जाणवत असूनही त्यांनी या भेटीला प्राधान्य दिले. मानेवाडी येथे पोहोचून त्यांनी संबंधित कुटुंबाची भेट घेतली, त्यांचे सांत्वन केले व धीर दिला.

मानेवाडी येथील भेट आटोपल्यानंतर रोहित पवार यांना जास्त त्रास जाणवू लागल्याने त्यांच्या वैद्यकीय पथकाने आणि डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुढील प्रवास थांबवण्याचा आणि पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या या सूचनेनंतर त्यांनी आजचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम व नियोजित दौरे तूर्तास रद्द केले आहेत….

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker