pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

प्रशासनाच्या आश्वासनानंतर कर्जत तालुक्यातील शेतकऱ्याने उपोषण सोडले

हद्दीखुणांची मोडतोड, कारवाईचा विलंब; प्रशासन हलले, तात्काळ मोजणीचे आदेश

Samrudhakarjat
4 6 9 9 5 2

कर्जत (प्रतिनिधी) – : कर्जत तालुक्यातील अळसुंदे येथील शेतजमिनीच्या हद्दीखुणा मोडल्याच्या व मोजणी प्रक्रियेत अडथळा आणल्याच्या वादामुळे एक शेतकरी थेट तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ळसुंदे येथील गट क्रमांक ४१६ या शेतजमिनीची दि. १५ मे २०२५ रोजी शासकीय मोजणी करण्यात आली होती. त्यानुसार कायम करण्यात आलेल्या हद्दीखुणांची शेजारील शेतकरी संजय बापू देवकाते व इतरांनी मोडतोड केली तसेच मोजणी प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याचा आरोप अर्जदार श्री. शिवाजी राजाराम पालवे यांनी केला आहे. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई होत नसल्याने पालवे यांनी दि. १५ एप्रिल २०२६ पासून कर्जत तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, कर्जत यांनी भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षकांना तात्काळ निर्देश देत संबंधित प्रकरणात पुन्हा शासकीय मोजणी करून देण्याचे आदेश दिले आहेत. अर्जदार मोजणीची फी भरण्यास तयार असल्याने नियमानुसार फी स्वीकारून तातडीने मोजणी प्रक्रिया पूर्ण करावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, प्रशासनाने उपोषणकर्त्याला उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले असून संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे सूचित केले आहे. तसेच उपोषण कायम ठेवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांवर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता कर्जत पोलीस ठाण्याला कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

यावेळी शिवाजी राजाराम पालवे, मधुकर बापू पालवे, ,गंगाराम बापू पालवे,

हद्दीखुणांचा वाद पुन्हा ऐरणीवर अळसुंदे येथील या प्रकरणामुळे शेतजमिनींच्या मोजणीतील वाद, हद्दीखुणांची सुरक्षितता आणि प्रशासनाच्या कारवाईतील विलंब यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा घटनांवर तातडीने व कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker