pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0
Advertisement
ब्रेकिंग

शरदचंद्र पवार गटाच्या कार्यालयाचे उत्साहात प्रारंभ

Samrudhakarjat
4 6 1 5 8 5

कर्जत, (प्रतिनिधी) : – येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार संपर्क कार्यालयाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. यावेळी पक्षचिन्ह तुतारीचे अनावरण करण्यात आले. आम्ही सदैव ज्येष्ठ नेते शरद पवरा यांच्या बरोबर, अशी शपथ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली.

नगराध्यक्ष उषा राऊत, गटनेते संतोष म्हेत्रे, उपगट नेते प्रा. सतीश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजय मोढळे व रघुनाथ काळदाते, शहराध्यक्ष विशाल म्हेत्रे, महिला आघाडीच्या माधुरी पाटील, नगरसेविका प्रतिभा भैलुमे व हर्षदा काळदाते, सरपंच पूजा सूर्यवंशी, नितीन धांडे, सुनील शेलार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

देशाचे नेते शरद पवार हा विचार आहे, जो कधीच संपू शकत नाही. तो विचार संपण्याचा विचार करणारे संपले. त्यांच्या नेतृत्वाखाली आमदार रोहित पवार यांच्या 

समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार देशात आणि राज्यात पुन्हा उभारी घेईल. शहर, गावे, वाड्या-वस्त्या एवढेच काय, सर्वांच्या हृदयातून तुतारी वाजेल आणि इतिहास घडवेल, अशा भावना यावेळी वक्त्यांनी मांडल्या. 

उपस्थितांना शपथ :-  आमदार रोहित पवार यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उमलते नेतृत्व, त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि निश्चित ध्येय धोरणे यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून, त्यांच्यावर खोटेनाटे आरोप आणि कारवाई होत आहे. मात्र, ते अन्यायाच्या विरोधात लढणारे असून, विजय हा सत्याचाच होईल. आम्ही सर्व जण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत आणि राहू, अशी शपथ उपस्थितांनी यावेळी घेतली.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110 google.com, pub-1628281367759110, DIRECT, f08c47fec0942fa0

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker