भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका तर्फे सेवा पंधरवाडा 2025 निमित्त कार्यशाळा संपन्न ….
भारताचे लाडके पंतप्रधान मा.श्री .नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.


(कर्जत प्रतिनिधी) :- विधान परिषदेचे सभापती मा ना श्री. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह कर्जत येथे कार्यशाळा भाजपा तालुकाध्यक्ष अनिल गदादे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर कार्यशाळेचे संयोजन शरद मेहत्रे गणेश काळदाते अभिषेक गवारे यांनी योग्य प्रकारे केले. सदर कार्यशाळेसाठी कर्जत मंडलातून अर्थात कर्जत तालुक्यातून बहुसंख्येने पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. सेवा पंधरवड्यामध्ये म्हणजेच 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान तालुक्यातील विविध गावात वेगवेगळे उपक्रम राबवण्याचे ठरले यामध्ये प्रामुख्याने वृक्षारोपण ,आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, व विविध स्पर्धा घेण्याचे ठरले .यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री काकासाहेब तापकीर, जि प सदस्य अशोक खेडकर, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस विनोद दळवी, तालुका दूध संघाचे चेअरमन मंगेश पाटील, नगराध्यक्षा, रोहिणी घुले,उपसभापती आबा पाटिल, सचिन घुले, व्हा. चेअरमन दादा खराडे, डॉक्टर सुनील गावडे, काकासाहेब धांडे, दादासाहेब सोनमाळी, संचालक, हर्ष शेवाळे , नंदकुमार नवले, उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे, सरपंच नितीन खेतमाळीस, प्रतिभा रेणुकर, संपतराव बावडकर, उपसरपंच लहुजी वतारे,शेखर खरमरे, सचिन पोटरे, सुदर्शन कोपनर, , सरपंच राहुल गागंर्डे, नगरसेवक सुनिल शेलार, नगरसेवक लालासाहेब शेळके, नगरसेवक देवा खरात, नगरसेवक रवींद्र सुपेकर उदयसिंग राजपूत, , स्वप्निल तोरडमल, अशोक कदम, सरपंच हनुमंत नवसरे, गणेश पालवे, कैलास बोरुडे सारंग घोडेस्वार, राणी गदादे ,सौ नीता कचरे, आरती थोरात, दत्तात्रय नलवडे, निळकंठ शेळके, नंदलाल काळदाते , अँड योगेश कापरे, उमेश जपे , सचिन खुडे, व इतर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नवनिर्वाचित कर्जत नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष तसेच तालुका दूध संघाचे चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच मिरजगाव ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित उपसरपंच कोरेगावचे उपसरपंच यांचा तसेच भारतीय जनता पार्टी जिल्हा पदाधिकारी यांचा तालुका भाजपा च्या वतीने सन्मान व सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा सहकारी बँक अहिल्यानगरचे वार्षिक सर्वसाधारण अहवालामध्ये विधान परिषद सभापती राम शिंदे यांचा फोटो नसल्याने सहकारी बँकेचा भारतीय जनता पार्टी कर्जत तालुका च्या वतीने निषेध नोंदवण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ना.प्रा.राम शिंदे यांचे स्वीय सहाय्यक प्रा.श्री. शेखर नवले, रोहित ढेरे , व प्रसाद भोसले यांचे योगदान लाभले.




