pub-1628281367759110
Advertisement
ब्रेकिंग

हशु आडवाणी विद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांची जिल्हा स्पर्धेसाठी निवड

Samrudhakarjat
4 4 5 4 6 6


राशीन प्रतिनिधी जावेद काझी. शालेय क्रीडा स्पर्धा 2025-26 अंतर्गत तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा नुकत्याच दादा पाटील महाविद्यालय कर्जत याठिकाणी नुकत्याच पार पडल्या या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये हशु आडवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राशीन येथील
वेगवेगळ्या गटातून सहभागी पंधरा विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचे समाज विकास संस्थेचे, संस्थापक अध्यक्ष मा. अल्लाउद्दीन एस काझी साहेब व विद्यालयाचे प्राचार्य श्री राजेंद्र नष्टे सर हार्दिक हार्दिक अभिनंदन केले.या स्पर्धेतील 14 वर्षे वयोगटात मोहिते कार्तिक भाऊसाहेब (वजन गट – 71 kg), काळे सोहम संदीप (वजन गट44 kg) 17 वर्ष वयोगटात फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात मोढळे संग्रामराजे सुरेश (वजन गट- 71kg ) काळे हर्षद रामदास (वजन गट- 80kg)

17 वर्ष ग्रिको रोमन कुस्ती स्पर्धेत चोरमले सुदर्शन शिवाजी (वजन गट- 92kg)
१९ वर्ष वयोगट फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत धोंडे प्रवीण विजय (65 kg) जानभरे ऋतुराज शरद (70kg) जाधव श्रेयस बबन (74kg ) बेद्रे प्रेमराज प्रदीप ( 92kg ) हे हे सर्व विद्यार्थी प्रथम क्रमांकाने विजयी झाले.त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्या स्पर्धेमध्ये दंडे प्रथमेश ईश्वर , मोहिते राम ज्ञानदेव, कायगुडे प्रेम रामहरी, लोंढे प्रणव माऊली हे विद्यार्थी उपविजेता ठरले. या स्पर्धेसाठी क्रीडा शिक्षक म्हणून श्री.शिंदे आजिनाथ आत्माराम व प्रा.आजबे संकेत सुभाष ,प्रा.शेलार विजय सुनील यांचे आणि सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे समाज विकास संस्थेचे, संस्थापक अध्यक्ष मा. अल्लाउद्दीन एस.काझी साहेब व विद्यालयाचे प्राचार्य श्री. राजेंद्र नष्टे सर व जूनियर विभाग प्रमुख प्रा. काळे विठ्ठल अर्जुन तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी अभिनंदन करून तसेच पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker