कर्जतचे पर्यावरण सैनिक शंभू ऑइल मिल आणि राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानकडून गौरवले

समृद्ध कर्जत : – कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनांनी जगाला स्वच्छता आणि पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. या संघटनेनि गेल्या १६६९ दिवसांपासून दररोज सकाळी एक तास स्वयंस्फूर्तीने स्वच्छतेचे काम सुरू ठेवले आहे. केवळ स्वच्छतेपुरते मर्यादित न राहता, उन्हाळ्यात झाडांना टँकरने पाणी देण्याचेही कार्य त्यांनी हातात घेतले आहे.
या सामाजिक संघटनेनि अथक प्रयत्नांची दखल कर्जतमधील प्रसिद्ध शंभू मसाले आणि तेल मिल यांनी घेतली. शंभू मसाले आणि तेल मिलचे किशोर तनपुरे यांच्या हस्ते या संघटनेचा सन्मान करण्यात आला. यावेळी तनपुरे यांनी शंभू मसाले आणि तेल मिल नेहमीच शुद्धतेसाठी आणि स्वच्छतेसाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
शंभू तेल मिल कर्जतवासीयांना शुद्ध व घरी बनवलेले तेल तसेच उच्च प्रतीचे मसाले उपलब्ध करून देत आहे, ज्यामुळे घरगुती जेवणाची चव वाढते. यासोबतच त्यांनी लोकांच्या आरोग्याची काळजी घेत सेंद्रिय भाज्याही विक्रीस उपलब्ध केल्या आहेत. किशोर तनपुरे यांच्या प्रयत्नांमुळे उच्च दर्जाचे तेल, मसाले स्थानिकांना सहज मिळू लागल्या आहेत.
सामाजिक संघटनेचे सदस्य विशाल मेहत्रे यांनी सांगितले की, त्यांनी कैलासवासी दिलीप नाना तरुण क्रीडा संकुलमधील विद्यार्थ्यांच्या मदतीने पळसवाडा वनराईतील झाडांना पाणी देण्याचे काम केले. किशोर तनपुरे यांनी या स्वयंसेवकांना जलपान उपलब्ध करून दिले, त्याबद्दल मेहत्रे यांनी विशेष कौतुक व्यक्त केले. तसेच, शंभू तेल मिलमधील स्वच्छ आणि पर्यावरणपूरक वातावरणाचेही त्यांनी प्रशंसा केली.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमानिमित्त सर्व सामाजिक संघटना, कर्जत व पर्यावरण प्रेमी यांच्यासाठी शंभू ऑइल मिल-मसाले व राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान यांच्या वतीने स्वादिष्ट अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी या आदरातिथ्याचा आनंद घेतला व कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
मेहत्रे यांनी पुढे सांगितले की, शंभू तेल मिल स्थानिक नागरिकांना भेसळमुक्त आणि घरगुती पद्धतीने तयार केलेले उच्च प्रतीचे तेल पुरवते. याशिवाय, मंदिरातील महाप्रसाद किंवा नाश्ता आयोजकांना श्री संत सद्गुरू गोदल महाराज यांचे चित्र भेट दिले जाते.
कार्यक्रमाच्या शेवटी, विशाल मेहत्रे यांनी किशोर तनपुरे यांचे सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान केल्याबद्दल आभार मानले आणि सामाजिक कार्याला सातत्याने पाठिंबा देण्याची विनंती केली.