कर्जत शहरात रामनवमी विविध कार्यक्रमांच्या आयोजनात मोठ्या उत्साहात साजरी

कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत शहरामध्ये मोठ्या उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आली कर्जत शहरांमध्ये आज मोठ्या उत्साहात राम नवमी साजरी करण्यात आली या निमित्ताने विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आले होते.
श्रीराम चौक येथील श्रीराम मंदिरामध्ये आमदार रोहित पवार यांनी प्रभू रामचंद्राचे दर्शन घेतले. यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी राम मंदिरासाठी रोहित पवार यांनी स्पीकर , माइक , साउंड यासह काही साहित्य दिले. तसेच मंदिरामध्ये असणाऱ्या सर्व मूर्तींना चांदीचा मुकुट तयार करून देण्याबद्दल मंदिराच्या विश्वस्तांनी परवानगी द्यावी असे उदगार आमदार रोहित पवार यांनी यावेळी काढले. मंदिरामध्ये असणाऱ्या प्रभू रामचंद्र सीतामाई लक्ष्मण व हनुमंत या चार मूर्तींना चांदीचे मुकुट आपण बसवू असे आमदार रोहित पवार यांनी जाहीर केले. यावेळी गजानन चावरे, रत्नाकर चावरे, बाळासाहेब चावरे, अरुण भणगे, सचिन कुलथे, विशाल मेहत्रे, ऋषिकेश धांडे,प्राध्यापक सतीश पाटील, रवींद्र सुपेकर , भाऊसाहेब तोरडमल, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मृत्युंजय ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रम
कर्जत येथील दीपक शहाणे यांच्या नेतृत्वाखाली मृत्युंजय ग्रुपच्या वतीने रामनवमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बाजार तळ येथे सकाळी हनुमान चालीसा याचे जाहीर वाचन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होत्या यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भव्य अशा प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यानंतर सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये अघोरी पथक हे सहभागी झाले होते. हे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
अखंड हिंदू समाज यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
कर्जत शहरातील अखंड हिंदू समाज यांच्या वतीने रामनवमीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये मध्य प्रदेश उज्जैन येथून खास डमरू पथक आले होते ते वाद्य आणि वाजवणारे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. याशिवाय इतरही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.