एनसीपी शरदचंद्र पवार पक्षातर्फे कर्जत नवनिर्वाचित नोटरी पब्लिक सदस्यांच्या सन्मान.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कर्जत शहर यांचा नावीन्यपूर्ण कार्यक्रम.

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत न्यायालयात सेवा देणाऱ्या विधिज्ञांची भारत सरकार नोटरी पब्लिक सदस्य पदी निवड झाली. या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार कर्जत शहर यांच्या वतीने
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात सन्मान करण्यात आला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष विशाल मेहेत्रे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवक शहराध्यक्ष नामदेव थोरात यांनी केले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कैलास शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सुनील शेलार, प्रसाद ढोकरीकर, सतीश पाटिल, ॲड. धनराज राणे, ॲड. बाळासाहेब शिंदे, ॲड. नवनाथ कदम यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच यावेळी ॲड. बाळासाहेब बागल, ॲड. बाळासाहेब टकले, ॲड. सुरेश वाकडे, ॲड. रामदास पुराणे, ॲड. शफी शेख, ॲड. संजय गायकवाड, ॲड. हरिश्चंद्र राऊत, ॲड. विनोद शिंगटे, ॲड. बाळासाहेब रगडे, ॲड. शरद रसाळ, ॲड. विषाद मोगल, ॲड. भालचंद्र पिसे, ॲड. आशा म्हत्रे या नवनिर्वाचित नोटरी पब्लिक सदस्यांच्या सन्मान करण्यात आला.
यावेळी नगरसेवक भास्कर भैलुमे, रवींद्र सुपेकर, राजेंद्र पवार, रज्जाक झारेकरी, राहुल नवले, प्रतीक ढेरे, मंगेश शिंदे, प्रीती जेवरे, मनोज गायकवाड, प्रसाद जेवेरे आदी उपस्थित होते.