कोंभळी, रवळगाव, थेरगाव येथे नियोजित औद्योगिक वसाहत कर्जत होणार..

समृध्द कर्जत / (प्रतिनिधी) :- आज दि.२८/०२/२०२४ रोजी उद्योग मंत्री नामदार श्री उदय जी सामंत साहेब यांच्या अध्यक्षते खाली त्यांच्या दालनात आ प्रा राम शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित विभागाच्या सर्व अधिकार्यां समवेत बैठक झाली . .
नियोजित एमआयडीसी साठी कोंभळी, रवळगाव थेरगाव यांच्या हद्दीतील जागा प्रस्तावित करणेत आली आहे . साधारणतः ४०० हेक्टर कोरडवाहू जमीन याठिकाणी उपलब्ध आहे . नगर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जवळच आहे .
काही तांत्रिक बाबीची पूर्तता करण्यात येणार आहे .क्षेत्र २५० हेक्टर पेक्षा जास्त असल्यामुळे महामंडळाचे जॉईट सीईओ श्री भंडारी साहेब हे जमिनी बाबतचा भूअहवाल सादर करणार आहेत आणि तो अहवाल हाय पॉवर कमिटी पुढे सादर होणार आहे . जागेबाबत माननीय मंत्री महोदय आणि सर्व अधिकारी याच्या समवेत सकारात्मक चर्चा झाली पुढील प्रक्रिया थोड्याच कालावधीत पूर्ण होईल .
हा अवर्षण प्रवण भाग आहे त्यामुळे इथे कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे . आता या ठिकाणी औद्योगिक वसाहत होताना या भागाचा निश्चित कायापालट होणार आहे .
या भागात एमआयडीसी व्हावी म्हणून भाजपाचे तालुकाध्यक्ष श्री शेखर खरमरे, श्री काकासाहेब तापकीर हे आग्रही होते . त्यांनी यासाठी जागा सुचवली होती आणि आज तीच जागी प्रस्तावित एमआयडीसी साठी होत आहे . या विषयी प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले कि ” या जागेची निवड म्हणजे आ प्रा राम शिंदे साहेब यांनी शाश्वत विकासाची गंगा या अवर्षण प्रवण भागात आणून आमच्या भागातील पिढयांन पिढ्यावर उपकार केलेला आहे . अल्पभूधारक त्यातही कोरडवाहू, दुष्काळ नेहमीचाच , शेतीसाठी पाणी येण्याची सुतराम शक्यता नाही . अशा परिस्थितीत इथे औद्योगिक वसाहत उभी राहण्याने या भागाचा विकास होणार आहे . मिरजगाव बाजारपेठ म्हणून विकसित होणार आहे . जवळच मराठवाडा हद्द आहे त्यांनाही याचा लाभ होणार आहे . . आ प्रा राम शिंदे साहेब यांनी या भागासाठी वरदान ठरणारी ही योजना मंजूर केल्या बद्दल या भागातील प्रत्येक नागरिक त्यांचा ऋणी आहे . आ . राम शिंदे साहेब, यांचे आभार मानायला माझे शब्द अपुरे पडत आहेत . अशी भावनिक प्रतिक्रिया श्री शेखर खरमरे यांनी दिली .”
या अवर्षण प्रवण भागात हि योजना मंजूर केल्या बद्दल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजित पवार, उद्योग मंत्री श्री उदय सामंत, महसूल मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कोंभळी, रवळगाव, थेरगाव व परिसराच्या नागरिकांच्या वतीने खूप खूप आभार .
या बैठकीसाठी श्री शेखर खरमरे श्री काकासाहेब तापकीर श्री सचिन पोटरे, श्री पप्पू धोदाड, श्री गणेश क्षीरसागर, श्री महेश तनपुरे,श्री तात्यासाहेब खेडकर, श्री शहाजी राजे भोसले,श्री धनु मोरे पाटील, श्री दत्ता मुळे, श्री नंदकुमारजी नवले, श्री गणेश पालवे, श्री राहुल गांगर्डे, श्री नदलाल काळदाते, श्री शरद म्हेत्रे, श्री काका ढेरे, बजरंग कदम,