शंभू ऑइल मिलची गुणवत्ता व विश्वास – एक नवा अध्याय : दिंडी सन्मवयक प्रवीण दादा घुले पाटील

कर्जत (प्रतिनिधी) चापडगाव स्थानिक कृषीउद्योगाला चालना देणाऱ्या शंभू ऑइल मिल ने आपल्या विश्वासार्हतेचा नवा अध्याय लिहिला आहे. गेल्या चार वर्षांपासून सातत्याने उच्च प्रतीचे करडई तेल पुरवणाऱ्या या उद्योगाने आता नॉन-पॉलिश डाळी व मसाल्यांच्या उत्पादनातही गुणवत्ता राखत एक नवीन पायरी गाठली आहे.
गावातील नामांकित शेतकरी विश्वास शिंदे व सरपंच विलास आप्पा निकत यांनी स्वतःच्या शेतात करडई बियाणे पिकवून शंभू ऑइल मिलला पुरवठा केला. त्यांच्या या प्रयत्नामुळे स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना अधिक संधी मिळत असून, शुद्ध व दर्जेदार उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोचत आहे.
शंभू ऑइल मिलमधील कुशल कारागीर राजू परब यांच्या मेहनतीचेही यावेळी कौतुक करण्यात आले. त्यांचे कौशल्य आणि मेहनतीमुळेच शंभू ऑइल मिलची उत्पादने ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहेत.
उत्कृष्टतेचा वारसा पुढे नेत, शंभू ऑइल मिल ने स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकण्यासह शुद्ध व पारदर्शी व्यवसायाचा आदर्श निर्माण केला आहे. आता तेलासोबत नॉन-पॉलिश डाळी आणि मसाले यांचीही विक्री सुरू करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना चांगल्या दर्जाची, आरोग्यासाठी लाभदायक उत्पादने सहज मिळू लागली आहेत.
या कार्यक्रमात दिंडी समन्वयक मांडगे सर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जिजाऊ प्रतिष्ठान व शंभू ऑइल मिल यांच्या संयुक्त विद्यमाने हिम्मतराव तनपुरे व तनपुरे गुरुजी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी आणि लोकसहभाग वाढवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले.
गेल्या चार वर्षांत शंभू ऑइल मिल ने केवळ व्यवसाय वाढवला नाही, तर आपल्या प्रामाणिकपणाने आणि दर्जेदार उत्पादनाने ग्राहकांच्या मनात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या उद्योगाचा स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होत असून, शेतकऱ्यांपासून ग्राहकांपर्यंत प्रत्येक जण याचा लाभ घेत आहे.