कर्जत येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना सन्मानित करण्यात आले

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांना ठिकठिकाणी सन्मानित करण्यात आले. दादा पाटील महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या हस्ते पत्रकारांना डायरी, पुस्तक, सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
मराठी विभागाचे प्रा. सुखदेव कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कर्जत तहसील कार्यालयात तहसीलदार गणेश जगदाळे यांनी डायरी व पेन भेट देऊन पत्रकारांचा सन्मान केला. श्री रुक्मिणी मल्टीस्टेटमध्ये श्री. वाघ यांच्या हस्ते पत्रकारांना दिनदर्शिका, श्री रेणुका मातेची प्रतिमा, शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.
पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष माळवे, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. किरण जगताप, ज्येष्ठ पत्रकार गणेश जेवरे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, मुन्ना पठाण, अफरोज पठाण, दिलीप अनारसे, नानासाहेब साबळे आदी पत्रकारांना कर्जत येथे सन्मानित करण्यात आले.