पत्रकार आशिषजी बोरा यांच्या मातोश्री विठाबाई उत्तमचंदजी बोरा यांचे वृद्धापकाळाने निधन

कर्जत (प्रतिनिधी) :- श्रीमती विठाबाई उत्तमचंदजी बोरा कवडगाव तालुका जामखेड या मूळ गावातील हा परिवार गेली साठ वर्षे कर्जत शहरात वास्तव्यास आहे .स्वर्गीय उत्तमचंदजी बोरा उर्फ बाबाजी कर्जत शहरातील उत्तम व्यावसायिक होते त्यांना दोन मुली सौ अलकाताई व लीलाताई ,आशिष ही तीन आपत्ये, तिघांनाही पदव्युत्तर शिक्षण देण्याची किमया बाईंनी साधली होती. पूज्य विठाबाईंचा धर्मावर खूप विश्वास होता . जैन धर्माची साधना करत असतानाच शेगावचे संत गजानन महाराज व कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरू गोदड महाराज यांची त्यांनी अनेक वर्ष भक्ती सेवा केली. पतीच्या अकाली निधनानंतर खचून न जाता निर्धाराने आपल्या प्रपंचाची वाटचाल केली शांत व संयमी स्वभाव ही बाईंची गुणवैशिष्ट्ये होती चांगली स्मरणशक्ती व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची त्यांची मनोवृत्ती होती ती त्यांनी अखेरपर्यंत जपली होती .पत्रकार आशिषजी यांच्या धार्मिक व सामाजिक कार्यास त्यांचा सतत पाठिंबा असे. आशिषजीच्या माध्यमातून त्यांनी समाजाची अखेरपर्यंत सेवा केली. त्यांची सर्व नातवंडे उच्चशिक्षित आहेत, वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत अखेर पर्यंत आपले उत्तम आरोग्य त्यांनी जपले होते.
त्यांच्यावर कर्जत येथे नागेश्वर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.