Advertisement
ब्रेकिंग

दादा पाटील महाविद्यालयात ‘बोलकी झाडे’ उपक्रमाचे आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन.

दादा पाटील महाविद्यालयाचा परिसर बोलक्या झाडांनी गजबजला

Samrudhakarjat
4 0 1 9 0 4

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेचा दादा महाविद्यालयाचा सात एकर परिसर बोलक्या झाडांनी गजबजला आहे. महाविद्यालय परिसरात एकूण १८० प्रजातीच्या वनस्पती असून त्यात पानफुटी, निम, कोरफड, रानतुळस अशा शेकडो औषधी वनस्पती नारळ, सिताफळ, रामफळ, आंबा, आवळा आदि शंभरहून अधिक फळझाडे, ड्रेसेना क्लोरोना, टिकोमा, ड्रेसेना महात्मा, सॉंग ऑफ इंडिया यासारख्या हजारो शोभेच्या वनस्पती महाविद्यालय परिसरामध्ये लावण्यात आलेल्या आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्यामुळे सर्व झाडांना ठिबक व तुषार सिंचन प्रक्रियेद्वारे ताजे टवटवीत ठेवले जात असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय नगरकर यांनी दिली.

            या सर्व झाडांची माहिती विद्यार्थी, पालक व नागरिकांना व्हावी म्हणून ‘वनस्पती शास्त्र’ विभागाने ‘बोलकी झाडे’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविला राबविला आहे. प्रत्येक झाडाला आधुनिक प्रणालीप्रमाणे क्यू आर कोड चिकटविण्यात आलेला असून सदर कोड स्कॅन केल्यास संबंधित वनस्पतीची संपूर्ण माहिती व त्या वनस्पतीचा उपयोग याविषयीचा संपूर्ण इतिहास काही सेकंदातच विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना मोबाईलमध्ये दिसू लागतो. म्हणून या उपक्रमाला 

 ‘बोलकी झाडे’ असे नाव देण्यात आले असल्याचे प्राचार्यांनी सांगितले. सदर उपक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर आमदार रोहितदादा पवार व ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महाविद्यालयाच्या सदर उपक्रमशीलतेचे कौतुक केले. ‘बोलकी झाडे’ उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसर, कर्जत शहर व परिसरातील हजारो झाडांची मोजणी व नोंदणी देखील महाविद्यालयाच्या वनस्पतिशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे.

         बोलकी झाडे या उपक्रमाबरोबरच महाविद्यालयाचे उपहारगृह, पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी, फॅशन डिझाइनिंग, ब्युटी अँड वेलनेस सेंटर, योगा व मेडिटेशन सेंटर, रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करणाऱ्या इटीपी तंत्र आदि प्रकल्पांचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे तसेच दैनिक सकाळ अहमदनगरचे सहयोगी संपादक प्रकाश पाटील, बंधुताचार्य प्रकाश रोकडे, प्रा. शंकर आथरे, प्रा. चंद्रकांत वानखेडे, संगीता झिंजूरके, नामदेव बापू राऊत, बाळासाहेब साळुंखे, संतोषआप्पा म्हेत्रे, सुभाषचंद्र तनपुरे, सुनील शेलार, प्रसाद ढोकरीकर, तात्यासाहेब ढेरे, लालासाहेब शेळके, भाऊसाहेब तोरडमल, नितीन धांडे, विशाल मेहेत्रे, पत्रकार निलेश दिवटे, गणेश जेवरे आदि मान्यवर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक, आजी-माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker