कर्जत ; कर्जतमध्ये माता रमाईची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

समृध्द कर्जत(प्रतिनीधी) :- महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारणी माता रमाई यांनी मोठा संघर्ष करत समाजाच्या मुक्तीसाठी सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळत बाबासाहेबांना आणि चळवळीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जी साथ दिली त्यातून मिळालेले स्वातंत्र्य कोणत्याही परिस्थितीत गमावता कामा नये असे प्रतिपादन माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आरपीआय चे राज्य उपाध्यक्ष विजयराव बाघचौरे यांनी व्यक्त केले कर्जत येथे आरपीआयच्या बतीने आयोजीत माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंती
निमित्त ते बोलत होते. कर्जत येथे माता रमाई यांच्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारा पासून त्याच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सर्वात प्रथम आरपीआयचे
राज्य उपाध्यक्ष विजयराव वाघचौरे,जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, प्रवीण घुले, दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलूमे, अजय साळवे, दक्षिण युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करत या मिरवणुकीला सुरुवात झाली. कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावरून श्रीराम मंगल कार्यालयात या मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुशराव भैलुमे यांनी प्रास्ताविक करताना आपण १९८४ पासून चळवळीत काम करत असून आगामी काळात आठवले साहेबाच्या नेतृत्वाखाली काम करताना समाजाच्या प्रश्नासाठी पुढे राहणार असल्याचे मत व्यक्त केले, याप्रसंगी प्रवीण घुले, अजय साळवे, दक्षिण युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, यांची भाषणे झाली. यावेळी अनेकांनी माता रमाई यांचा संघर्ष आपल्या
भाषणातून मांडत त्याच्या आदर्श व्यक्तिमत्त्वा प्रमाणे व त्याच्या त्यागातून आणि संघर्षातून प्रेरणा घेऊया असे आवाहन केले.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांनी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण आयुष्याच्या यशस्वी बाटचालीमध्ये माता रमाईचा सिंहाचा वाटा होता. पोटच्या चार मुलांना गमावून ही या त्यागी मातेने कशाचीही तमा न बाळगता ठामपणे डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पाठीशी उभ्या असायच्या असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास आरपीआयचे दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलूमे, उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजू जगताप, बिलास साठे, ज्येष्ठ नेते भीमराव बाघ, नाना पाटोळे, नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठुबे, गौतम घोडके, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजक उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश भैलुमे, सतीश आल्हाट, लक्ष्मण आखाडे, कुंडली गंगावणे, अविनाश चव्हाण, मुस्लिम अल्पसंख्यांक आघाडीचे तालुका अध्यक्ष निसारभाई शेख यांनी विशेष मेहनत घेत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कर्जत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते विलास भोईटे, चेतन आखाडे, अमोल देवळे, गणेश आखाडे, स्वप्निल शिंदे, विशाल घोडके, संकेत घोडके, प्रकाश मोरे., हौसराव मोरे, बाळासाहेब मोरे, बाळासाहेब मोरे, संदीप चव्हाण, देवा खरात, बळीराम कांबळे, प्रकाश आखाडे, सतीश वाघमारे, बाळासाहेब बाघमारे, दत्तात्रेय भैलुमे, अजय भैलुमे, सुजित भैलुमे, बाळासाहेब शिंदे, दादा शिंदे, विष्णू चव्हाण, रामभाऊ चव्हाण, दादा गंगावणे, पोपट गंगावणे, अशोक कांबळे, सिताराम कांबळे, आदी उप- स्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कुंडलिक गंगावणे यांनी सर्वांचे आभार मानले.