दादा पाटील महाविद्यालयाच्या सोनाली मंडलिकला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल

कर्जत (प्रतिनिधी) :-कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयाची कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिला पुणे येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघातून खेळताना सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. आजपर्यंत सोनाली मंडलिकला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ब्रॉन्झ, सिल्व्हर पदके मिळाली होती परंतु गोल्ड मेडल मिळाले नव्हते. सोनाली मंडलिकला शारीरिक शिक्षण संचालक डॉ. संतोष भुजबळ यांचे मार्गदर्शन लाभले.
कुस्तीपटू सोनाली मंडलिक हिच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, शारीरिक संचालक डॉ. संतोष भुजबळ, क्रीडा शिक्षक प्रा. शिवाजी धांडे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.