दादा पाटील महाविद्यालयाचे प्रश्नमंजुषा व पथनाट्य स्पर्धेमध्ये यश

कर्जत (प्रतिनिधी) :- रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत दादा पाटील महाविद्यालयाच्या संघाने उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले आहे. सौरभ मारुती ढवळे (टी. वाय. बी. ए.)
महेश संजय रोकडे (टी. वाय. बी. कॉम.) हे विजेते स्पर्धक आहेत. या स्पर्धेमध्ये एकूण ३२ महाविद्यालयातील संघांचा सहभाग होता.
पुणे येथे झालेल्या ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील’ राज्यस्तरीय पथनाट्य स्पर्धेमध्ये दादा पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या संघाने ‘विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक’ पटकावले. तसेच सांस्कृतिक विभागाचा विद्यार्थी प्रकाश दत्तू शिंदे या विद्यार्थ्यास ‘उल्लेखनीय अभिनय पुरस्कार’ मिळाला. यशस्वी पथनाट्य संघात गणेश पवार, प्रकाश शिंदे, कल्याणी बोरा, प्रिती शिंदे, अजित पवार, स्वामीराज जाधव, रोहन बनकर, कल्याणी बोरा, ज्ञानेश्वर वायसे, आदित्य केंदळे, विवेक गायकवाड, दिव्या शिंदे आदि विद्यार्थ्यांनी वैचारिक पथनाट्य सादर करत पारितोषिकावर नाव कोरले. गणेश पवार या विद्यार्थ्याचे संहिता सहकार्य लाभले. पथनाट्य संघाचे संघव्यवस्थापक म्हणून प्रा. स्वप्नील म्हस्के यांनी काम पाहिले. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. प्रमोद परदेशी व सांस्कृतिक विभागाच्या सदस्यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले.
पथनाट्य व प्रश्नमंजुषा स्पर्धेतील यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळके, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य आमदार रोहितदादा पवार, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य अंबादासजी पिसाळ, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य बप्पाजी धांडे, राजेंद्र निंबाळकर, प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रमोद परदेशी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले.