राज्य शासकीय, निमशासकीय ,शिक्षक शिक्षकेतर, कर्मचारी 14 मार्चपासून बेमुदत संपावर

कर्जत (प्रतिनिधी) :- सरकारी, निमसरकारी कर्मचारी 14 मार्च २०२३ पासून सुरु होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत संपात सहभागी होणार. कोरोना काळात सरकारी, निमसरकारी ,मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. वेळप्रसंगी अनेक शिक्षक कर्मचाऱ्यांनी आपले बलिदान दिले .त्यामुळे कोरोनाच्या अत्यंत भयंकर संकटावर मात करता आली. परंतु शासनाने मुख्याध्यापक ,शिक्षक , शिक्षकेत्तर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या खालील मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले .सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा ,सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा ,सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा ,चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे पद निरसित करू नका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या. तसेच कॅशलेस मेडिकल योजना सुरू करा, विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान लागू करा .अशा अनेक मागण्या दीर्घकाळ प्रलंबित ठेवण्यात आल्या आहेत. अशा दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या जिव्हाळ्याच्या मागण्या मिळविण्यासाठी मंगळवार दिनांक 14 मार्च 2023 पासून राज्यातील सरकारी ,निमसरकारी, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपावर जात आहेत .याविषयी अहमदनगर जिल्हा प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली श्री मोरे साहेब, नायब तहसीलदार कर्जत यांना त्या संदर्भातील निवेदन देण्यात आले. त्यावेळी घोषणा देण्यात आल्या ,”एकच मिशन- जुनी पेन्शन” यावेळी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अंतर्गत हिशोब तपासणीस- भालचंद्र देशमुख, अजित वडवकर ,प्राथमिक शिक्षक जिल्हा बँकेचे माजी संचालक- शरद सुद्रिक ,नाशिक विभागीय अध्यक्ष -नवनाथ अडसूळ, शिक्षक भारतीचे राज्य कार्याध्यक्ष -दिनेश खोसे ,मिलिंद तनपुरे -शिक्षक परिषदेचे नेते, कर्जत तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष -राजेंद्र माने, सचिव -संदीप काळे, सहचिटणीस -कल्याण गावडे, खजिनदार -परशुराम गांगर्डे, महिला प्रतिनिधी- अर्चना जंजिरे , ग्रामसेवक संघटनेचे -श्याम भोसले ,दत्तात्रय मेंगडे,इब्टाचे तालुका अध्यक्ष -श्याम राठोड ,गुरुकुल मंडळ आघाडीच्या नेत्या- स्मिता रसाळ, गुरुमाऊली मंडळाचे नेते -योगेश खेडकर ,जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष -विनोद देशमुख ,असे अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते